Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोल

जाहिरात

 

खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळी

schedule11 Nov 26 person by visibility 12 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -:हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शाहूवाडी तालुक्यातील सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथे त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली. या दौऱ्यादरम्यान णून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे शुभेच्छा संदेश त्यांनी ग्रामस्थांपर्यंत पोहोचवले. यावेळी शेतकऱ्याच्या त्यांनी सर्वांसोबत झुणका-भाकरीचे जेवण केले. उपस्थित महिलांना फराळ वाटप केले. याप्रसंगी उपसरपंच बळवंत मुगडे, बाबा लाड, चंद्रकांत मुगडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रुकडी जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, संभाजीराव देसाई, ओमकार चौगुले, दादासाहेब गावडे, सागर कुंभार, दिनकर भोसले, धोंडीराम खोत, मन्नू खोत, आणि संजय खोत उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी आरोग्याची हेळसांड, रस्ते व एसटी बसची अनुपलब्धता, तीव्र पाणीटंचाई, रेशनिंग व सातबारावरील नावे, तसेच वन्यप्राण्यांचा त्रास यांसारख्या विविध बिकट समस्या मांडल्या. या सर्व समस्यांवर खासदार माने यांनी अत्यंत सकारात्मक व संवेदनशील भूमिका घेत तात्काळ ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथील रस्ते व दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लवकरच विशेष बैठक घेतली जाईल अशी ग्वाही दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes