Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोलमहायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशाराशिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडेकोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळी

जाहिरात

 

मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोल

schedule09 Nov 26 person by visibility 182 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ' मी समोरून लढणारा माणूस आहे,  तुमच्यासारखा पाटील खंजीर खुपसत नाही ' अशा शब्दात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. 'माझ्यावर जातीवादाचा आरोप करण्याअगोदर चार वेळा विचार करायला हवा होता. गेली पंधरा वर्षे माझ्या मांडीला मांडी लावून विविध संस्थेत  एकत्र काम केले. सत्तेत सोबत राहिलात. त्यावेळी मी तुम्हाला जातीयवादी वाटलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोकुळचे निवडणूक लढविलात. मात्र माझ्यामुळेच तुम्हाला गोकुळची दारे उघडी झाली. माझ्यामुळेच तुमचा  गोकुळमधील प्रवेश झाला." अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला
 गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीतील राजकारण आणि शासन नियुक्त संचालकांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय विरोधात कोल्हापुरात आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघाला. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. खासदार विशाल पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, माजी आमदार ऋतुराज पाटील,  माजी आमदार जयंत आसगावकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याप्रसंगी बोलताना आमदार पाटील यांनी महायुती सरकार , मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गोकुळ दूध संघामध्ये शासन नियुक्त संचालक निवडणे व त्यांना मतदानाचा अधिकार देण्याचे पाप मंत्री मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. हे त्यांचेचच षड्यंत्र आहे. शासन नियुक्त जे चार संचालक नेमण्याचा निर्णय झाला आहे त्यांचा गोकुळ व दूध उत्पादनाशी काही संबंध नाही. कोल्हापुरातील डॉ. प्रवीण हेंद्रे हे स्त्रीरोग तज्ञ आहेत तर शिवाजीराव आडनाइक हे जिल्हा बँकेत नोकरीला आहेत. चार संचालकापैकी वकील प्रशांत पाटोळे हे सांगलीचे आहेत. सांगलीच्या व्यक्तीला गोकुळच्या दूध संघामध्ये संचालक करण्यामागील उद्देशच काय ? गोकुळ दूध संघ हा अमूलच्या दावणीला बांधण्याचा  सत्ताधाऱ्यांचा डाव दिसतो. शासन नियुक्त संचालकामध्ये त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना संधी दिली नाही. नाथाजी पाटील होते, अशोक फराकटे होते, करवीर मधील बाळासाहेब खाडे होते... मात्र त्यांना संधी दिली गेली नाही. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर जाजमा उचलत राहायचे का असा सवाल करत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचले.
 निवडणुकीमध्ये मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा पराभव झाला. त्या पराभवावरून मंत्री मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना उद्देशून गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटलांनी जातीय राजकारण केले असा आरोप केला होता. त्या आरोपाचाही आमदार पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. 'गोकुळच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफ यांनी चार वेळेला माझ्या मुलाचा पराभव झाला असे सांगत आहेत मात्र त्याचवेळी मातंग समाजातील उमेदवार सुजित मिंणचेकर यांचा पराभव झाला.. कागल मध्ये मराठा समाजातील युवराज पाटील यांचा पराभव झाला याविषयी ते एक वाक्य बोलत नाहीत. निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. दोन महिने जिल्हा पिंजून काढला. दूध उत्पादकांना माझी भूमिका पटवून दिली यामध्ये माझा काय दोष आहे. असा सवाल पाटील यांनी केला
गोकुळच्या निवडणुकीमध्ये समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. महायुतीने अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहून सहकार्य करावे असे यासाठी मी स्वतःहून फोन केला होता. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील  यांना चेअरमन करण्यासाठी त्यांनी महायुतीच्या संचालकांना बैठकीसाठी उपस्थित ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. गोकुळ मधील अध्यक्ष निवडीच्या घडामोडीवरून व दूध उत्पादकाने दिलेला बहुमत डावलण्याचे राजकारण सुरू आहे त्या विरोधात संघर्ष मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चाला कोल्हापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला हा संघर्ष मोर्चा फक्त कोल्हापूरचा नाही तर संपूर्ण राज्याचा बनला. लढलो तर आपण जिंकू शकतो हा विश्वास निर्माण केला विविध जिल्ह्यातील नागरिक यामध्ये सहभागी झाले. कोल्हापुरातील संघर्ष मोर्चामध्ये 2029 मधील सत्ता परिवर्तनाची बीजे रोवली आहेत सत्ता परिवर्तनाची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. कळ आम्ही काढली नाही, तुम्ही काढली. सुरुवात तुमच्याकडून झाली शेवट आम्ही करू . अब रण होगा, रण ऐसा होगा की फिर कभी ऐसा रण नही होगा.' असे पाटील यांनी म्हटले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes