Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोलमहायुती विरोधात कोल्हापुरात उसळला जनसागर, संघर्ष मोर्चाद्वारे सरकारला इशाराशिक्षकच माझी जात –शिक्षकच माझा धर्म! शिक्षण क्षेत्रासाठी चोवीस तास उपलब्ध !! आमदार कौस्तुभ गावडेकोल्हापुरातील डॉक्टरांचा अनोखा सेवाभाव, भेट म्हणून मिळालेले पाच लाख रुग्णांच्या उपचारासाठीगोकुळसाठी संघर्ष चिघळतोय, शासननियुक्त संचालकांच्या अध्यादेशाला समविचारीचे कोर्टात आव्हानआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी धनगर बांधवांसमवेत साजरी केली दिवाळी

जाहिरात

 

अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखल

schedule10 Nov 26 person by visibility 670 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महायुती आणि समविचारी आघाडीमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवडीचे सभा होणार आहे या सभेसाठी गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे सकाळी 11 वाजता सभेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या सभेसाठी महायुतीचे बारा संचालक व समविचारी आघाडीचे तेरा संचालक सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गोकुळ दूध प्रकल्प येथे दाखल झाले याशिवाय शासन नियुक्त चार संचालक हे पोलीस बंदोबस्तामध्ये सभास्थळी दाखल झाले आहेत
 समविचारी व महायुतीच्या संचालकाने गोकुळ दूध प्रकल्प येथे पोहोचल्यानंतर गोकुळचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारासमविचार्य आघाडीचे 13 संचालक दाखल झाले यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार असे प्रमुख दावेदार असलेले शशिकांत पाटील चुयेकर, संचालक शशिकांत खोत बाबासाहेब देवकर, अभिजीत तायशेटे, बाबासाहेब चौगुले, प्रा. किसन चौगुले, विद्याधर गुरंबे, राहुल देसाई, माजी आमदार राजू बाबा आवळे, अंजना रेडेकर भाग्यश्री डोंगळे, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव हे संचालक समविचारी आघाडी कडून निवडून आले आहेत.तर महायुतीचे 12 संचालक आहेत यामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार यासाठी प्रमुख दावेदार असलेले संचालक रणजीत पाटील, माजी आमदार राजेश पाटील, अजित नरके त्यांचा समावेश आहे याशिवाय संचालक राहुल पाटील, अंबरीश घाटगे, वीरेंद्र मंडलिक, अजित पाटील, चेतन नरके, करणसिंग गायकवाड, अमरसिंह पाटील, मदन देसाई आदी संचालक आहेत. महायुतीचे संचालक फेटे बांधून दाखल झाले आमदार राजेश पाटील यांनी गांधी टोपी परिधान केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes