Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकर

जाहिरात

 

श्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळा

schedule06 Jun 26 person by visibility 106 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : श्री रवळनाथ को ऑपरेटिह हौसिंग फायनान्स संस्थेच्या, कोल्हापूर शाखेचा चौदावा वर्धापनदिन व शाखेने १०० कोटी ठेवींचा टप्पा पार केल्यानिमित्त सोमवारी (आठ जून २०२६) ‘आनंद सोहळा ’ आयोजित केला आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले व संस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवाजी विद्यापीठ येथील मानव्यशास्त्र सभागृह येथे दुपारी चार वाजता हा आनंद सोहळा होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत हे प्रमुख अतिथी आहेत. याप्रसंगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त असिस्टंट जनरल मॅनेजर अविनाश जोशी यांचे, ‘आजचे बँकिग आणि त्यातील जीवन’ या विषयी व्याख्यान आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर, कुलसचिव व्ही. एन. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे.

संस्थापक अध्यक्ष चौगुले म्हणाले, ‘ मध्यमवर्गियांना  हक्काचं घरकुल साकारण्यासाठी सुलभ अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटी ही संस्था स्थापना केली. तीन दशकांच्या यशस्वी वाटचालीत संस्थेने विविध सामाजिक उपक्रमातून गरजूंना मदतीचा हात दिला आहे.  १४ ऑक्टोबर, १९९६ रोजी १८ सभासद व १० हजार भाग भांडवलावर संस्थेची स्थापना झाली. शिक्षक, शासकीय आणि निमशासकीय नोकरदारांना स्वप्नातील घरकुल बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने फायनान्स सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या अर्थसहाय्यातून आजअखेर तब्बल चार हजाराहून घरकुले उभी राहिली आहेत. त्यापैकी ४०० घरे ही सैन्यदलातील जवानांची आहेत.

गडहिंग्लज येथे संस्थेचे सुसज्ज प्रधान कार्यालय असून सध्या संस्थेच्या २६ शाखा कार्यरत आहेत. त्यापैकी ७ शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत. ३१ मे, २०१६ अखेर १६०४२ सभासद तर स्वः भांडवल व स्वनिधी ३४.४७ कोटी आहे. ५८१ कोटीच्या ठेवी असून ४०४ कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एकूण २१२ कोटीची गुंतवणूक असून एकूण व्यवसाय तब्बल ९८५ कोटीचा आहे. १८ मार्च, २०१५ रोजी संस्थेला मल्टी स्टेट दर्जा मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक व दिल्ली असे कार्यक्षेत्र आहे. जून २०१२ मध्ये कोल्हापूर शाखेचा शुभारंभ झाला. कोल्हापूर शाखेने १०३ कोटी ठेवींसह ५१ कोटी कर्ज वितरण केले आहे. ’ पत्रकार परिषदेला संस्थेच्या कोल्हापूर शाखेचे चेअरमन विजय हरुगडे, कोल्हापूर शाखा सल्लागार प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes