Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद  संपर्कावर भरश्री रवळनाथ को - ऑप हौसिंग फायनान्सच्या कोल्हापूर शाखेचा सोमवारी वर्धापनदिन, शंभर कोटी ठेवीबद्दल आनंद सोहळाअखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्तीपालकमंत्री लक्ष देणार का ? सहा महिने पगार थकीत… जिल्हा परिषदेतील जलजीवनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाली कोण !महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकर

जाहिरात

 

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या कार्यकारिणीवर महापौर रुपाराणी निकम यांची नियुक्ती

schedule06 Jun 26 person by visibility 39 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम यांच्या कार्यकुशलतेची व प्रशासकीय कार्यातील महत्वपूर्ण योगदानाची दखल घेत अखिल भारतीय महापौर परिषदेतर्फे त्यांची परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्सचे सचिव मनोज गुप्ता यांच्या निमंत्रणानुसार महापौर सौ. निकम यांनी दि. ३ जून २०२६ रोजी ऋषिकेश, उत्तराखंड येथे आयोजित अखिल भारतीय महापौर परिषद, नवी दिल्ली यांची कार्यकारिणीची 117 वी बैठकीत सहभाग घेतला. यावेळी उत्तराखंडचे कॅबिनेट मंत्री मदन कौशिकजी, ऋषिकेशचे आयोजक तथा होस्ट मेयर शंभू पासवानजी व ऑल इंडिया काउंसिल ऑफ मेयर्सचे अध्यक्ष तथा करनालाचे महापौर श्रीमती रेणु बाला गुप्ता यांच्या हस्ते महापौर  निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.अखिल भारतीय महापौर परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान महापौर निकम यांनी कोल्हापूर शहराशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांकडे सर्व मान्यवरांचे लक्ष वेधले. कोल्हापूर हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर असून शहराची हद्दवाढ लवकरात लवकर करण्यात यावी,तसेच शहरातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्व समजण्यासाठी स्वत: महापौर स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन शहराला स्वच्छ व सुदंर ठेवण्यासठी  प्रयत्नशील राहत असले बाबत त्यांनी संभाषणात सांगितले तसेच शहरातील नागरिकांनां मुलभूत सोयीसुविधा व अडचणी बाबतच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनता दरबार’ उपक्रमाची माहिती त्यांनी परिषदेतील उपस्थितांना दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes