Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत 

schedule05 Jun 26 person by visibility 22 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या’असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांनी केले.  
 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. राजर्षी शाहू छत्रपती सभागृह येथे कार्यशाळा झाली. अध्यक्षा खोत, उपाध्यक्ष  तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. बांधकाम समिती सभापती सारीका य.नांदेकर, समाज कल्याण समिती सभापती श्रध्दा अ. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपाध्यक्ष पाटील म्हणाले, ‘घनकचरा व्यवस्थापन फक्त ग्रामस्थांची जबाबदारी नाही तर लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या समन्वयाने गाव स्तरावर काम केल्यास यामध्ये निश्चितच यश मिळेल.’मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी कचरा व्यवस्थापनाच्या सोप्या आणि कमी खर्चिक पद्धती व पर्याय ग्रामस्थांपर्यंत पोहचविल्यास  गावे नक्कीच स्वच्छ व कचरामुक्त होतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी घनकचरा व्यवस्थापन नियमावलींची माहिती दिली. कार्यशाळेमध्ये घनकचरा व्यवस्थापनामध्ये ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट काम केलेले ग्रामपंचायत अधिकारी  संजय शिंदे, श्रीमती  सुरेखा आव्हाड, श्रीमती गीता कोळी यांनी घनकचरा व्यवस्थापन विषयक सादरीकरण केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes