Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेत महायुतीत मानापमान नाट्य, कार्यालय प्रवेश कार्यक्रमापासून शिवसेना नगरसेवक चार हात लांबसभागृह नेता, स्थायी समिती सभापतींचा कार्यालयीन प्रवेशईएसआय रुग्णालय - ओपीडीमधील समस्या तातडीने सोडवा : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनची मागणीकोरे अभियांत्रिकीत सहाशेहून अधिक विद्यार्थ्यांची विविध कंपन्यात निवडप्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावू या : अध्यक्षा शिल्पा खोत कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकरशिक्षक  - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही या पद्धतीने कामकाज करा, शिक्षक आमदारांच्या अधिकाऱ्यांना सूचनामहाव्दार रोड रिक्षा, चारचाकींसाठी खुला करावापश्चिम महाराष्ट्रातील पहिले इलेक्ट्रिक व्हेईकल प्रशिक्षण केंद्र विवेकानंद संस्थेतअभियांत्रिकी प्रवेशाच्या शंकांना मिळणार पूर्णविराम; केआयटीतर्फे रविवारी मोफत मार्गदर्शन कार्यक्रम

जाहिरात

 

कलाकार - कामगारांचे स्वप्नं साकारण्यासाठी…वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी महामंडळाच्या निवडणुकीत - संग्राम भालकर

schedule05 Jun 26 person by visibility 227 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही चित्रपट व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून चित्रपट व्यावसायिकांसाठी चांगले काम करण्याचा माझा इरादा आहे. चित्रपट कामगारांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, सिनेमा नाट्य व नृत्य क्षेत्रातील ज्येष्ट कलावंतांचा परिसंवाद, कला मेळावा घेणे, वृदध कलावंतांच्या मानधन योजनेसाठ पाठपुरावा आण्ि चित्रीकरण वाढविण्यासाठी वेगवेग्ळया संकल्पना राबविणे हे उद्देश डोळयासमोर ठेवून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे.अशी भूमिका नृत्य दिग्दर्शक संग्राम यशवंत भालकर यांनी मांडली.

  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची रविवारी, सात जून रोजी निवडणूक आहे. या निवडणुकीत नृत्य दिग्दर्शन विभागातून नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर हे अपक्ष म्हणून लढत आहेत. त्यांचे चिन्ह फुलपाखरू आहे. ‘कलेला गुरुस्थानी मानणारे भालकर्स निवडणूक रिंगणात.’हे ब्रीद निश्चित करुन ते सभासदांना भेटत आहेत. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा भागाचा दौरा केला. मुंबई, पुणे, ठाणेसह राज्यातील वेगवेगळया भागातील सभासद मतदारांशी संपर्क साधला. मतदारांचा प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचे भालकर  यांनी सांगितले. भालकर कुटुंबीयांची चौथी पिढी सिनेक्षेत्रात कार्यरत आहे. चित्रपट दिग्दर्शक व महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर यांचा वारसा संग्राम भालकर पुढे चालवित आहेत.

‘चित्रपट महामंडळात चांगले काम करायचंयासाठी निवडणूक लढायची ही वडिलांची ईच्छा पूर्ण करण्यासाठी आणि चित्रपट कामगार, कलाकारांचे प्रश्न मांडणारा हक्काचा संचालक महामंडळात असावा हे या घटकाचे स्वप्नं आहे ते साकारण्यासाठी निवडणूक लढवित आहे. सिनीअर कलाकार आणि नवोदित कलाकारांतील दुवा म्हणून आपण काम करू. आतापर्यंत जवळपास ५० सिनेमासाठी नृत्य दिग्दर्शन केले आहे. सिनेमा क्षेत्राशी निगडीत प्रत्येक घटकासोबत आपले स्नेहपूर्ण संबंध आहेत.गेल्या काही वर्षात महामंडळाच्या कारभाराची घडी चुरगळलेली आहे. ही घडी नीट करण्याला आपला प्राधान्यक्रम राहील.महामंडळाचे अस्तित्व कायम टिकवून ठेवण्यासाठी योग्यरित्या काम करेन.‘अशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी दिग्दर्शक संजय टिपुगडे म्हणाले,‘संग्राम भालकर यांची प्रतिमा चांगली आहे. सकारात्मक दृष्टीकोन व साऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची वृत्ती आहे. महामंडळात संग्राम भालकर यांच्यासारखा तरुण चेहरा प्रतिनिधी म्हणून निवडून द्यावा.‘ सपना भालकर म्हणाल्या, ‘संग्राम भालकर हे सिनेसृष्टीतील प्रत्येक घटकाशी निगडीत आहेत. त्यांच्या माध्यमातून कलाकार, कामगार, ज्येष्ठ कलावंत, निर्माता, तंत्रज्ञ या घटकांसाठी विविध योजनाकरिता निश्चित पाठपुरावा होईल. स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी त्यांना निवडून द्या.’पत्रकार परिषदेला सैफ बारगीर, जयदीप निगवेकर, महेश बगाडे, अरविंद कोळी आदी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes