अपक्ष उमेदवार संग्राम भालकरांचा सभासद संपर्कावर भर
schedule06 Jun 26 person by visibility 38 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार संग्राम भालकर यांनी सभासद मतदारांच्या संपर्कावर भर दिला आहे. सभासदांच्या भेटी घेऊन निवडणूक लढविण्यामागील भूमिका मांडत आहेत. या निवडणुकीत त्यांचे चिन्ह फुलपाखरू आहे. नृत्य दिग्दर्शक विभागातून त्यांची उमेदवारी आहे.‘आपुलकीचे विश्वासाचे आपले एक मत, महामंडळाच्या यश किर्तीचे’अशी साद ते सभासदांना घालत आहेत. चित्रपट कामगारांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक, सिनेमा नाट्य व नृत्य क्षेत्रातील ज्येष्ट कलावंतांचा परिसंवाद, कला मेळावा घेणे, वृदध कलावंतांच्या मानधन योजनेसाठी पाठपुरावा आणि चित्रीकरण वाढविण्यासाठी वेगवेगळया संकल्पना घेऊन ते मतदारांना भेटत आहेत. भालकर कुटुंबीयांची यांची चौथी पिढी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. चित्रपट दिग्दर्शक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर यांचे ते चिरंजीव आहेत.