नगरविकासच्या सचिवांसाबत क्रिडाई पदाधिकाऱ्यांची २१ ऑगस्टनंतर मंत्रालयात बैठक-खासदार श्रीकांत शिंदे
schedule26 Jul 25 person by visibility 73 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ क्रिडाई कोल्हापूरच्या नगरविकास विभागाशी निगडित विविध प्रश्नांचे अनुषंगाने नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांच्या समवेत मंत्रालयात येत्या २१ ऑगस्ट नंतर मिटींग लावण्यात येईल ’अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशिल माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित कदम, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार शिंदे हे शनिवारी (२५ जुलै २०२५) कोल्हापूर दौऱ्यावर होते. सायंकाळी हॉटेल सयाजी येथे क्रिडाई कोल्हापूरचे पदाधिकारी, बांधकाम व्यावसायिक यांच्यासोबत त्यांचा वार्तालाप कार्यक्रम झाला.या कार्यक्रमात क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के.पी.खोत यांनी शहराचे विविध प्रश्नांची मांडणी केली. बैठकीत रिडेव्हलपमेंट(पुनर्विकासासाठी) ९ मीटर रस्त्याला ३६ मीटर उंचीची मान्यता ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत आहे त्याप्रमाणे कोल्हापूर शहराला सुध्दा 36 मीटर उंचीची मागणी प्रामुख्याने करण्यात आली. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील डीपी रस्त्यांचा विकास चांगल्याप्रकारे होण्यासाठी किंवा हे रस्ते ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरविकास विभागामध्ये एक वेगळी टी.डी.आर कमिटी किंवा टी.डी.आर. साठी वेगळे युनिट तयार करावे. त्या युनिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भेटून शेतकऱ्यांचा दारापर्यंत जावून त्यांचे 7/12 उतारे गोळा करून त्यांना टि.डी.आर.सर्टिफिकेट देऊन अशा गरज असलेल्या डी.पी.रस्त्याचे ताबडतोब ॲक्वीझेशन टी.डी.आर च्या माध्यमातून करून ते रस्ते विकसित करण्याची मागणी केली. शहरातील उड्डाणपूल, शहरातील बगीचे त्याचबरोबर शहराची हद्दवाढ अशा प्रमुख मागण्या क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष खोत यांनी बैठकीत मांडल्या.
या चर्चेत क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, महेश यादव, गिरीश रायबागे, गणेश सावंत, अजय डोईजड, नंदकिशोर पाटील, निखिल शहा, श्रीराम पाटील, कृष्णा पाटील, श्रीनिवास गायकवाड, प्रमोद साळुंखे, क्रिडाई कोल्हापूर चे संचालक सचिन ओसवाल, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, चेतन चव्हाण, संदिप पोवार,अमोल देशपांडे, संग्राम दळवी, अतूल पोवार,सुनिल चिले हजर होते. सचिव गणेश सावंत यांनी आभार मानले.