सोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभ
schedule26 Jul 25 person by visibility 22 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त २८ जुलै २०२५ रोजी राजर्षी शाहू लोकरंग पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. शाहीर रंगराव पाटील शाहिरी पोवाडा कलामंचतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच हा कार्यक्रम होणार आहे. शाहीर रंगराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. या कार्यक्रमात विविध मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबूराव कदम, मर्दानी खेळाचे वस्ताद आनंदराव ठोंबरे, प्रा. डॉ. आनंद गिरी, शाहीर शहाजी माळी, शाहीर राजू राऊत, पत्रकार सुनीलकुमार सरनाईक, सिने-नाट्य निर्माते व लेखक सुनील माने यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.