हॉटेल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटील
schedule26 Jul 25 person by visibility 114 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हॉटेल व संबंधित व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ लाटकर, उपाध्यक्षपदी मोहन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी लाटकर यांचे नाव संचालक उज्ज्वल नागेशकर यांनी तर उपाध्यक्षपदासाठी पाटील यांचे नाव संचालक जयवंतराव पुरेकर यांनी सुचविले. यावेळी संचालक आनंद माने, राजेंद्र माळकर, सचिन शानभाग, कल्पना निकम, वृंदा जोशी आदी उपस्थित होते. प्राधिकृत अधिकारी एस. एस. कुंभार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.