जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर - इचलकरंजीचा महापौर शिवसेनेचा करूया : कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
schedule26 Jul 25 person by visibility 148 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला न भूतो न भविष्यती असा विजय मिळाला. विधानसभेच्या दहापैकी दहा जागा महायुतीने जिंकल्या. आपणाला खासदार- आमदार बनवणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. महायुती म्हणून या निवडणुका ताकतीने लढू. कार्यकर्त्यांना विजयी करू या.त्याचवेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, इचलकरंजी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर शिवसेनेचा करूया अशा घोषणा शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी केल्या.
निमित्त होते, शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून नागाळा पार्कात शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. लोकसभेतील शिवसेनेचे संसदीय गटनेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शनिवारी या कार्यालयाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यानिमित्त आयोजित मेळाव्याला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी तुडुंब गर्दी केली होती. याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते खासदार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देऊ अशी ग्वाही दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकासाठी केलेल्या लोककल्याणकारी योजनांचा अनेक मानला. शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व आहे. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षाच्या कालावधीत त्यांनी पायाला भिंगरी बांधून राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांचे कल्याण साधले. आता महायुतीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. एकनाथ शिंदे यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या साऱ्यांना लोकसभा व विधानसभेला त्यांनी बळ दिले. कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सगळ्या नेते मंडळींची आहे. विधानसभेसारख्या यशाची पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत करावी. कोल्हापूरसाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सगळ्या विकास कामाची पूर्तता करू. पूरनियंत्रणासाठी 3200 कोटी रुपयांचा प्रकल्प, रंकाळा तलाव सौंदर्यीकरण, कन्व्हेंशन सेंटर, शाहू समाधी स्थळ विकास, केशवराव भोसले नाट्यगृहाचे नूतनीकरण विविध विकास कामांचा शिंदे यांनी भाषणात उल्लेख केला. ठाकरे गटाचे नेतेमंडळी केवळ टोमण्याने शिव्याशाप देण्याचे काम करतात मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. त्यांनी विरोधकांना विकास कामातून उत्तर दिले आहे असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रास्ताविक करताना 80 टक्के समाजकारणाने 20 टक्के राजकारण या शिवसेनेच्या सूत्रानुसारच आमची वाटचाल सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम केले. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळाले त्यामागे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांनी अडीच वर्षे जे काम केले ते आणि साऱ्यांच्या योगदानाचे फलित आहे. सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध विकासकामांना चालना देऊ. मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय लोकांना हक्काचे ठरेल असे आबिटकर यांनी नमूद केले. खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या विचारांचा जनसागर निर्माण झाला आहे. पाच आमदार व एक खासदार शिवसेनेचे आहेत. महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत समितीच्या सर्व निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना विजयी करण्यासाठी आपण सारे प्रयत्न करूया. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचा महापौर शिवसेनेचा असेल यासाठी सारे झटू या. आमदार चंद्रदीप नरके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी मिळाला हवी. सर्वच ठिकाणी भगवा फडकवू या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसाग यांनी आगामी निवडणुका ताकतीने जिंकू असे सांगितले. माजी खासदार संजय मंडलिक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूरवर अतिशय प्रेम आहे. ज्या ज्या वेळी कोल्हापूरवरती संकट आले त्या त्यावेळी ते मदतीसाठी धावून आले असेही मंडलिक म्हणाले. या मेळाव्याला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अशोकराव माने, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, माजी आमदार सुजित मिणचेकर, जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, प्रा. जालंदर पाटील, युवा सेनेचे ऋतुराज क्षीरसागर, वीरेंद्र मंडलिक, शिवाजी जाधव, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, आनंदराव खेडकर, अभिजीत चव्हाण, राहुल चव्हाण, दुर्गेश लिग्रस, कमलाकर जगदाळे, रणजीत जाधव, अभिजीत खतकर आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.