Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मेडिकल बिलाचा आरोप सिद्ध करा, आमदारकीचा राजीनामा देतो ! अन्यथा तुम्ही राजकीय संन्यास घ्या !! राजेश क्षीरसागरांचे खुले चॅलेंजकोण कुठेही जाऊ दे- कितीही उडया मारू दे ! कोल्हापुरात काँग्रेसला थांबविण्याची ताकत कोणात नाही !! निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गर्दीचा महापूरनगरविकासच्या सचिवांसाबत क्रिडाई पदाधिकाऱ्यांची २१ ऑगस्टनंतर मंत्रालयात बैठक-खासदार श्रीकांत शिंदेअमका आला, तमका गेल्याचे मला टेन्शन नाही, सतेज पाटील म्हणजे माणसं तयार करण्याची फॅक्टरी विधानसभेच्या निवडणुकीत कोणाची घंटी वाजली ?नरके, क्षीरसागरांची सतेज पाटलांच्यावर टीकाजिल्हा परिषदेचा अध्यक्ष, कोल्हापूर - इचलकरंजीचा महापौर शिवसेनेचा करूया : कार्यकर्त्यांच्या तुडुंब गर्दीत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटनमहापालिकेतील लाचखोरी, ठेकेदारांकडून अधिकाऱ्यांच्या नावासहित टक्केवारीची रक्कम जाहीर  !!सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !जातीवंत म्हैस खरेदीसाठी गोकुळच्या अनुदानात वाढ ! सचिवांचे कमिशन वाढविलेसोमवारी लोकरंग पुरस्कार वितरण समारंभ

जाहिरात

 

कोण कुठेही जाऊ दे- कितीही उडया मारू दे ! कोल्हापुरात काँग्रेसला थांबविण्याची ताकत कोणात नाही !! निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला गर्दीचा महापूर

schedule27 Jul 25 person by visibility 45 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसतर्फे बोलाविण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने गर्दीचा महापूर आला. काँग्रेस कमिटीत उभे राहायला जागा नव्हती. कार्यकर्त्यांची खचाखच गर्दी, नेते-पदाधिकाऱ्यांची जोशपूर्ण भाषणे याद्वारे काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकल्याचे चित्र निर्माण झाले. आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि खासदार शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (२६ जुलै २०२५) हा मेळावा झाला. ‘लाभाची पदे देऊनही अनेकांनी गद्दारी केली, त्यांना निवडणुकीत धडा शिकवू या. कोण कुठेही जाऊ दे- कितीही उडया मारू दे,  कोल्हापुरात काँग्रेसला थांबविण्याची ताकत कोणात नाही.’असा निर्धार यावेळी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

 आमदार जयंत आसगावकर यांनी ‘काँग्रेस कमिटीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा महापूर आला आहे. ही गर्दी विरोधकांना धडकी देणारी आहे. काँग्रेसने देश आणि समाजहिताचा कारभार केला. शिक्षण, शेती, आरोग्य, जलसिंचन अशा सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे. हे सारे नव मतदारापुढे मांडू या.’ माजी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, ‘आगामी महापालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकत दिली जाईल. जो संघर्ष करतो तो कधी हरत नाही. खासदार शाहू महाराज, आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीतही काँग्रेसचा करिश्मा कायम राहील. कोण कुठेही जाऊ दे, कितीही उडया मारू देत. कोल्हापुरात काँग्रेसला थांबविण्याची ताकत कोणात नाही. जे गेले ते स्वार्थी आणि जे सोबत राहिले ते सारथी आहेत. ’

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण म्हणाले, ‘निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मेळावा आहे. कार्यकर्ते हीच आमदार पाटील यांची ताकत आहे. महापालिका असो की अन्य स्थानिक स्वराज्य संस्था प्रत्येक ठिकाणी त्यांनी सन्मानाची पदे दिली. संघर्ष हा काही नवीन नाही. २०१४ मध्येही अशीच स्थिती होती. तेव्हा महापालिकेत झेंडा फडकला.येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकवू. आमदार पाटील यांनी शहर विकासाची अनेक कामे केली आहेत. थेट पाइपलाइन योजनेमुळे शहरवासियांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळते. या योजनेचे श्रेय आमदार पाटील यांना आहे.’

माजी नगरसेवक राजू लाटकर म्हणाले, ‘राज्यातील महायुतीचे सरकार हे लोकांनी निवडून दिलेले नव्हे तर ईव्हीएम मशिनद्वारे चोरुन आलेले सरकार आहे. सत्ताधारी मंडळी कोल्हापूर बिघडवण्याचे काम करत आहेत. कोल्हापूरला मोठी वैचारिक परंपरा आहे. आपण सारे एकत्र येऊन कोल्हापूरपण जपू या. मुळात भाजप, शिवसेना शिंदे पक्षांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आम्हीही हिंदू आहोत. सत्ताधारी मंडळी केवळ विकासाच्या बाता मारतात. जातीभेद करतात. शंभर कोटीचे रस्ते दिसत नाहीत. रात्र वैऱ्याची आहे. कार्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे. कोल्हापुरात खुले आम गांजा विक्री होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी काँग्रेसच्या माध्यमातून मोहिम राबवू. ’ आनंद माने, भूपाल शेटे, अमर समर्थ यांनी मनोगते व्यक्त केली.

 माजी नगरसेवक तौफिक मुलाणी म्हणाले, ‘आमदार सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठे केले. अनेकांना पदे दिली.मात्र काही जण सोडून गेले. अशा गद्दारांना शिक्षा झालीच पाहिजे. येत्या महापालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवू या.’ दुर्वास कदम म्हणाले, ‘मेळाव्याला झालेली गर्दी पाहून कोल्हापुरातील लोक हे आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होते. आले किती, गेले किती कोल्हापुरात काँग्रेस आणि सतेज पाटील यांचाच दरारा आहे. आम्ही कायम तुमच्यासोबत राहू.’ अध्यक्षस्थानावरुन बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीतही विजयाची पताका फडकवू. एकमेकांना आडवे न जाता साऱ्यांनी एकत्रितपणे काम केले तर विजय निश्चित आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes