सचिन शिरगावकर, बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर !
schedule26 Jul 25 person by visibility 31 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एसबी रिशेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सचिन शिरगावकर यांना बेस्ट इंजिनीअर ऑफ द इयर हा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. इंडियन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशनच्यावतीने (एसटीएआय) सुवर्णपदक देऊन शिरगावकर यांचा सन्मान झाला. राष्ट्रीय साखर संस्था कानपूरच्या संचालिका प्रा. सीमा पारोहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. साखर उद्योगासाठी अभिनव अभियांत्रिकी साधन प्रदान केल्याबद्दल शिरगावकर यांना पुरस्कार देण्यात आला. डीसीएम श्रीराम लिमिटेडचे माजी संचालक श्रीराम तमक, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, प्रकाश आवाडे, अमित कोरे, संजय अवस्ती व रणजित पुरी उपस्थित होते. नवी दिल्लीतील प्रतिष्ठित भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. इंडियन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशनचे यंदा शताब्दी वर्ष आहे. यानिमित्त ८३ वे वार्षिक अधिवेशन व आंतरराष्ट्रीय साखर एक्झपो २०२५ नवी दिल्लीत झाले.