गोकुळच्या अध्यक्षाची निवड तीस मे रोजी, शशिकांत पाटील-चुयेकरांचे नाव आघाडीवर
schedule24 May 25 person by visibility 55 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नूतन अध्यक्षाची निवड (३० मे २०२५) होणार आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त पदावर ही निवड होणार आहे. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात दुपारी तीन वाजता नूतन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईल. सहकारी संस्था (दूध) पुणे विभागीय सहनिबंधक राजकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड होणार आहे. नूतन अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वसमावेशक चेहरा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे ते चिरंजीव आहेत.