अजित पवारांनी घेतली महादेवराव महाडिकांची भेट
schedule23 May 25 person by visibility 41 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी पवार यांनी महाडिक यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी महाडिक परिवाराच्यावतीने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार अमर महाडिक, स्वरूप महाडिक, माजी आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्ले, कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, ग्रीष्मा महाडिक, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, मकरंद बोराडे, शिरोली ग्रामपंचायत सरपंच पद्मजा करपे यांच्यासह शिरोली ग्रामपंचायत सदस्य आणि महाडिक परिवारातील सदस्य उपस्थित होते.
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पवार आणि मंत्री मुश्रीफ यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.