अवनिचा अरुणोदय पुरस्कार संपतराव पवार यांना जाहीर
schedule24 May 25 person by visibility 41 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अवनि संस्थेतर्फे अरुण चव्हाण व डॉ. अरुण गांधी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा ‘अरुणोदय’पुरस्कार बळीराजा प्रकल्पाचे संपतराव पवार यांना जाहीर झाला आहे. सन्मानचिन्स, मानपत्र व रोख दहा हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. रविवारी (२५ मे २०२५) सायंकाळी चार वाजता हॉटेल ओपल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती अवनि संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व्यंकाप्पा भोसले, प्रा.रसिया पडळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. पुरस्कारार्थी, संपतराव पवार हे सांगली जिल्ह्यातील बलवडी येथील आहेत. दुष्काळ निर्मूलन, निसर्ग संवर्धन, जलसंवर्धन, मानव संशाधन विकास व युवक विकास या क्षेत्रात भरीव काम केले आहे. बलवडी येथे त्यांनी लोकसहभागातून बळीराजा स्मृती धरण बांधले आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून अरुणोदय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला साताप्पाा मोहिते, अमर कांबळे व रवी कुराडे उपस्थित होते.