Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उउ ततमेरी वेदर क्रिकेट क्लबतर्फे पंचगंगा स्मशानभूमीला शेणीदान कोल्हापूरच्या आयटी पार्कचा निर्णय अंतिम टप्प्यात, अमल महाडिकानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट भाऊ पाध्ये हे मानवतावादी, अनुभववादी लेखक - समीक्षक प्रा. अविनाश सप्रे कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याघघ ततकोल्हापुरात निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरु करण्यास तत्वत: मान्यता - राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, क्रीडामंत्र्यांचे विधीमंडळात उत्तर !!शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला जोरदार प्रतिसादमहापालिका निवडणुकीच्या जागा वाटपासाठी काँग्रेसची समिती, चार दिवस मित्रपक्षांशी चर्चासातारा-कागल महामार्गाच्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा : खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

तळसंदेतील डीवाय  पाटील पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड

schedule24 May 25 person by visibility 289 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तळसंदे येथील डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या ५५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली.  यामध्ये प्रामुख्याने पुणे येथील बजाज ऑटो कंपनीमध्ये २९ विद्यार्थ्यांची, मदरसन ऑटोमॅटिक' पुणे मध्ये ७ विद्यार्थ्यांची  'रिटजेन इंडिया पुणे' या कंपनीत १३ विद्यार्थ्यांची  आणि  'भारत फोर्ज' कंपनीमध्ये ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 निवड झालेल्या विद्यार्थ्यामध्ये  इलेक्ट्रिकल विभागाच्या सानिका यादव, हर्षदा पाटील, सोनाली मुळीक, समीक्षा वडगावे, कोमल खोत, साक्षी पटेकरी, मनश्री पाटील, अमृता पाटील, वृषाली चव्हाण, रसिका गराडे, सानिका नरुटे,  , सानिका भोसले, सुचिता खुटाळे, सीझान बारगीर, अक्षय घुंगुरकर, मानस शिंदे, अमन मुजावर, तेजस पवार, कार्तिक पाटील, तनिष्क लोहार, हर्षवर्धन शिंदे, चिराग होनराव, रिद्धेश गायकवाड, जयदीप आळवेकर, प्रशांत सूम्भे, स्वरांजली पवार, साक्षी हांडे, समृद्धी खामकर, समृद्धी सूर्यवंशी यांचा समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून श्रावणी पाटील, फिजा ढालाइत, स्नेहल बागणे, आदित्य खंबे-पाटील, केदार माळी यांची तर मेकॅनिकल विभागातून महेश मोहिते, मिलिंद चौगुले, संस्कृती चौगुले, नेत्रा चौगुले, पार्थ पाटील, विवेक जितुरी, प्रणव पाटील, पुष्कराज ऐद, संकेत कदम, प्राची मदने, चंदना मदने या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

विविध कंपनीमार्फत कॉलेजमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. यामधून निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना किमान 2 लक्ष ते 3 लक्ष प्रतीवर्ष पॅकेज दिल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी प्रा. अक्षय खामकर यांनी दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर, प्लेसमेंट अधिकारी प्रा.अक्षय खामकर, पॉलिटेक्निक उपप्रचार्या प्रा. कलिका पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes