Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेतगार्डन्स क्लबतर्फे पाच डिसेंबरला विशेष कार्यक्रमवेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणीविद्यार्थ्यांनी दिलेले प्रेम हीच माझ्या आयुष्याची शिदोरी - सागर बगाडेदहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिमआयुष्यात स्ट्रेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा, माणसांनी अवाजवी अपेक्षा न ठेवल्यास जीवनयात्रा आनंदयात्रा बनतेकलेच्या प्रसारासाठी सागर बगाडेंनी महाराष्ट्रभर दौरा करावा, संपूर्ण प्रवास खर्च उचलू - मंत्री चंद्रकांत पाटीलमी कडवट शिवसैनिक, चाळीस वर्षे संघटनेत ! पश्चिम महाराष्ट्रात सर्वात सिनीअर, आता राज्य पातळीवर काम करण्याची ईच्छा ! !आयकर कायद्याचे अज्ञान पतसंस्थांना ठरू शकते आर्थिकदृष्ट्या महागडे – सीए अजय शेडबाळे इचलकरंजी, दि. उद्योजक नितीन मेनन यांचे निधन

जाहिरात

 

वेतनपथक कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या,   खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची मागणी

schedule23 Nov 26 person by visibility 29 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वेतन व भविष्य निर्वाह निधी सिंधुदुर्ग, कार्यालयास पूर्ण वेळ कर्मचारी द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे करण्यात करण्यात आली मागणीचे निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक बालाजी यरमुनवाड व प्रशासनाधिकारी समरजीत पाटील  यांनी स्वीकारले.
      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक यांची बदली व पदोन्नती झाल्यामुळे या कार्यालयाकडे कोणताही कर्मचारी पूर्ण वेळ कार्यरत नाही.या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा कार्यभार माध्यमिक वेतन पथक कार्यालयाकडील कर्मचाऱ्यांच्याकडे देण्यात आला आहे परंतु प्रत्यक्ष दरमहा वेतन देयकाव्यतिरिक्त, मेडिकल बिले फंडाची बिले, सेवानिवृत्ती प्रकरणे फरक बिले इत्यादी कामे प्रलंबित राहत आहेत.
  खाजगी प्राथमिक वेतन पथक कार्यालयाकडे तातडीने पूर्ण वेळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.शिष्टमंडळात खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष गणपत चौकेकर, जिल्हा सचिव, राजन नार्वेकर, राज्य कार्यकारणी सदस्य रेनॉल्ड बुतेलो,सल्लागार शांताराम जंगले, जिल्हा कार्यकारणी सदस्य सचिन तुळसुलकर, करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes