दारु पिऊन कार चालविताना दोघांना उडविले, गोकुळच्या माजी चेअरमनांचा मुलगा पोलिसांच्या अटकेत
schedule23 Nov 26 person by visibility 863 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : गोकुळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांचे चिरंजीव पद्मसिंह पाटीलला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. दारु पिऊन वेगाने कार चालवित दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी पद्मसिंहवर कारवाई केली. रविवारी, 22 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री अकरा वाजून 45 मिनिटांच्या सुमारास शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका या रस्त्यावर ही घटना घडली. या अपघातामध्ये सायबर चौक परिसरातील उमेश पाथरुड आणि गणेश पाथरुड यांचा मृत्यू झाला. उमेश आणि गणेश हे दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. पद्मसिंह पाटील हे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनाने विद्यापीठ समोरील रोडवरुन शाहू टोलनाक्याडके भरधाव वेगाने जात होते. यावेळी त्याच्या वाहनाने दुचाकीवरील उमेश व गणेश यांना जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. दोघांना गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाला होता. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. राजारामपुरी पोलिसांनी चारचाकी वाहन चालक पद्मसिंह पाटीलला अटक केली आहे मद्यप्राशन करुन गाडी चालवित असल्याची माहिती प्राथमिक चौकशीत पुढे आली आहे