Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिमआयुष्यात स्ट्रेस हा ताटातल्या मिठाईइतकाच असावा, माणसांनी अवाजवी अपेक्षा न ठेवल्यास जीवनयात्रा आनंदयात्रा बनतेकलेच्या प्रसारासाठी सागर बगाडेंनी महाराष्ट्रभर दौरा करावा, संपूर्ण प्रवास खर्च उचलू - मंत्री चंद्रकांत पाटीलमी कडवट शिवसैनिक, चाळीस वर्षे संघटनेत ! पश्चिम महाराष्ट्रात सर्वात सिनीअर, आता राज्य पातळीवर काम करण्याची ईच्छा ! !आयकर कायद्याचे अज्ञान पतसंस्थांना ठरू शकते आर्थिकदृष्ट्या महागडे – सीए अजय शेडबाळे इचलकरंजी, दि. उद्योजक नितीन मेनन यांचे निधनगारगोटीत विशेष नेत्र रुग्णालयाचे रविवारी लोकार्पण; अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ डॉ. रईसा मुल्ला यांना पीएचडीअध्यक्ष - उपाध्यक्षांनी घेतली काँग्रेसच्या सदस्यांची भेट, सोमवारी महायुतीची बैठकट्रॅक्टर ट्रॉली अंगावर, साखर कारखान्याच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू

जाहिरात

 

कलेच्या प्रसारासाठी सागर बगाडेंनी महाराष्ट्रभर दौरा करावा, संपूर्ण प्रवास खर्च उचलू - मंत्री चंद्रकांत पाटील

schedule22 Nov 26 person by visibility 60 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘संघर्ष, कला अन् सेवाभावाचा संगम म्हणजे कलाशिक्षक सागर बगाडे होय. आपल्यातील कला केवळ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता तिचे जतन, संवर्धन आणि प्रचार-प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर प्रवास करावा. आपल्या कलेच्या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा द्यावी आणि देशाच्या विकासप्रक्रियेत योगदान द्यावे. महाराष्ट्रभर होणाऱ्या प्रवासाचा संपूर्ण खर्च पक्षाच्यावतीने उचलण्यात येईल,’ असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक सागर बगाडे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, शिक्षक नेते दादासाहेब लाड, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी राहुल चिकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मास्तरप्रेमी मंचच्या वतीने शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे या सोहळा झाला. यावेळी सागर बगाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे म्हणाले, ‘सागर बगाडे हे केवळ एक आदर्श शिक्षक नाहीत, तर शिक्षणाच्या पलीकडे जाऊन समाजाशी नाळ जोडणारे, कलेची आवड जपणारे आणि युवाशक्तीला विधायक दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच त्यांनी विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडाविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात आनंद, उत्साह आणि सकारात्मकता निर्माण केली आहे. ’

खासदार धनंजय महाडिक यांनीही सागर बगाडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. युवाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक उपक्रम राबविले आहेत. शिक्षक म्हणून केलेली सेवा आणि सेवेनंतरही समाजासाठी कार्यरत राहण्याची त्यांची भूमिका नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes