मी कडवट शिवसैनिक, चाळीस वर्षे संघटनेत ! पश्चिम महाराष्ट्रात सर्वात सिनीअर, आता राज्य पातळीवर काम करण्याची ईच्छा ! !
schedule22 Nov 26 person by visibility 140 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘मी एक कडवट शिवसैनिक आहे. गेली चाळीस वर्षे शिवसेनेत काम करत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मी सर्वात सिनीअर आहे. संघटनात्मक जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडली आहे. पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी राज्यात सगळीकडे फिरत आहे. पश्चिम महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. पक्षासाठी गेली चाळीस वर्षे सातत्याने काम करत असताना तडजोड कधी केला नाही. पक्षासाठी लढत राहिलो. शिवसैनिकांना बळ दिले. पक्ष एकसंघ ठेवला. आता राज्य पातळीवर काम करण्याची ईच्छा आहे. पक्ष नेतृत्व नक्कीच संधी देतील. मला जर मंत्रीमंडळात स्थान मिळालं, पालकमंत्रीपद मिळाले, तर कोल्हापूर जिल्ह्यात विकासाचं एकही काम शिल्लक राहणार नाही…’हे आश्वासक बोल आहेत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे.
आमदार क्षीरसागर यांचा येत्या २४ नोव्हेंबर रोजी ५९ वा वाढदिवस आहे. क्षीरसागर हे गेली चाळीस वर्षे शिवसेनेत आहेत. विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख, शहरप्रमुख अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे. कोल्हापूर शहरात तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. कोल्हापुरात शिवसेना म्हटलं की राजेश क्षीरसागर आणि क्षीरसागर म्हटलं की शिवसेना असे समीकरण तयार झालं आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा प्रवास त्यांनी मांंडला.
‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारकार्यांनी प्रभावित होऊन गेली चार दशकं शिवसैनिक म्हणून काम करत आहे. सहा मे १९८६ रोजी शिवसेनाप्रमुखांचे कोल्हापुरात आगमन झाले हाते. दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मे रोजी त्यांची बिंदू चौकात सभा झाली. त्या सभेला मी उपस्थित होतो. शिवसेनाप्रमुखांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगिकारलं आहे. पक्ष नेतृत्वानी जी जबाबदारी दिली, जो आदेश दिला तो प्रामाणिकपणाने पार पडला. नेत्यांच्या मनातलं ओळखून काम करणारा मी कार्यकर्ता.आमदार म्हणून शहर विकासाला चालना दिली. विविध प्रकल्प सुरू केले. महायुतीच्या माध्यमातून आता शहरात विकासाच्या विविध योजना सुरू आहेत. सर्किट बेंच सुरू झाले. आयटीपार्कसाठी जागा मंजूर झाली. बहुउद्देशीय सभागृहाचं काम मला आत राज्य पातळीवर काम करायचं आहे.
नेत्यांच्या मनातील ओळखून काम करणारा मी कार्यकर्ता
मला कधी सांगायलाही लागलं नाही की आपल्या नेत्यांच्या मनात काय आहे ? कुठली आंदोलन केलं पाहिजे ? कुठलं सामाजिक काम केलं पाहिजे ? विकासात्मक कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहजे ? पक्ष वाढीसाठी काम केलं. संघटना बळकट केली. नारायण राणे हे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेचे अस्तिव काय असा प्रश्न उपस्थित केला मात्र आपण संघटनात्मक काम केलं. कार्यकर्त्यांना बळ दिलं. २०२२ मध्ये शिवसेनेत जो उठाव झाला, त्यावेळी सर्वप्रथम, शिवसेनेचे मुख्य नेते, तत्कालिन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी उभा होतो. त्यांचे माझ्यावर व माझे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे.’
पक्ष नेतृत्वाकडून राज्य पातळीवर संधी मिळेल..
क्षीरसागर म्हणाले ‘मी आजपर्यत ज्या पदावर काम केले त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केले. शिवसेना शहरप्रमुखपद… आमदार असो की राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद. साऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मला आता राज्यासाठी काम करण्याची संधी मिळावी. कार्यकर्ता पक्षासाठी झिजत असतो, नेत्यांनी दिलेला शब्द पाळावा. पक्ष नेतृत्व निश्चितच संधी देतील. मला जी जबाबदारी देतील ते अतिशय प्रामाणिकपणाने काम करेन.’