दहा -दहा महिन्याचा महापौर ठरलंय…मात्र मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांचा आदेश आमच्यासाठी अंतिम
schedule22 Nov 26 person by visibility 69 categoryलाइफस्टाइलमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी ‘कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीच्या नेतेमंडळीची बैठक झाली होती. त्या बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला ठरविताना दहा -दहा महिन्याचा महापौर करायचं ठरलंय. मात्र यासंबंधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असेल.’असे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना महापालिकेतील राजकारण, पदाधिकारी बदल या अनुषंगाने उपस्थित प्रश्नावर ते बोलत होते. ‘कोणी कितीही टीका करुन दे, महायुतीतील एकी कायम आहे. महायुती एकसंघ आहे.पक्ष वाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. प्रत्येक मिटिंगला वाद झाला आहे.महापालिका निवडणुकीच्या कालावधीत जागा वाटपाप्रसंगी प्रत्येक मिटिंगला वाद झाला. मात्र महापालिका निवडणूक लढविताना आम्ही सारे एकवटलो. महायुतीसाठी आम्ही काही तडजोडी केल्या. काही ठिकाणच्या जाग सोडल्या. मात्र बॉसने शब्द टाकला की, सारे महायुतीचे घटक पक्ष एकत्र काम करतो. महापालिका निवडणुकीत महायुतीच्या सगळया उमेदवारांच्या विजयासाठी आम्ही लढलो. गटतट आणि पक्ष पाहिला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्ती एकनाथ शिंदे हे उत्तम नेते आहेत. त्यांनी अतिशय उत्तमरित्या महाराष्ट्राचा गाडा चालविला आहे. ’
महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर पालकमंत्री आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आणि मी अशी संयुक्त बैठक झाली होती. यावेळी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत दहा महिन्याचा महापौर हा फॉर्म्युला ठरला होता. दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार महाडिक हे मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी सव्वा वर्षाचा महापौर असावा असे सांगितल्याचे मंत्री पाटील व खासदार महाडिक यांनी आम्हाला सांगितले. मात्र या संदर्भात आम्हाला कोणताही आदेश नाही. दरम्यान यासंबंधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा आदेश हा आमच्यासाठी अंतिम असेल.मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेऊ. त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. महापालिकेतील राजकारण वेगळं आहे, त्याची माहिती देऊ. जे ठरलेलं असतं ते घडलं तर कटुता येत नाही.’
………..
गुंडगिरी कशी संपवायची असते हे दाखवून दिले
आमदार क्षीरसागर म्हणाले, ‘मी समोरुन लढणारा कार्यकर्ता आहे. पाठीमागून वार करत नाही. कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागते. पक्षनिष्ठेसाठी कधी तडजोड केली नाही. २०२२ मधील शिवसेनेतील चळवळीनंतर मी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिलो.काहींनी माझ्या घरावर मोर्चे काढण्याचा प्रयत्न केला. पोस्टर फाडले. काही गुंडांना वाटत होते, आपल्यासारखा कोणी मोठा गुंड नाही. मात्र गुंडगिरी कशी संपवायची असते हे आम्ही दाखवून दिले.’