Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सवाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखी

जाहिरात

 

डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

schedule30 Aug 26 person by visibility 1564 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार तांत्रिक प्रशिक्षण, कोडिंग प्रॅक्टिस, कम्युनिकेशन स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, करिअर काउन्सेलिंग तसेच प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण दिले जाते. उद्योगक्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासावर भर दिल्याने त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या  संधी मिळत आहेत. या निवडीसाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सीएसई विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल , प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes