दप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !
schedule29 Aug 26 person by visibility 48 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :'दप्तर हलके करा, बालपण वाचवा!' या संकल्पनेंतर्गत कागल तालुक्यातील विद्यामंदिर वाळवे खुर्द जिल्हा परिषद शाळेने उपक्रम राबविला. जड दप्तरांमुळे मुलांच्या पाठीवर पडणाऱ्या ताणाची चिंता व्यक्त करत आहेत. अनेक बालतज्ज्ञांनीही यावर उपाययोजना सुचविल्या होत्या. सरकारने 'एकच पाठ्यपुस्तक' हा प्रयोग अमलात आणला होता, पण त्याचा फारसा सकारात्मक उपयोग झाला नाही. मात्र, वि. मं. वाळवे खुर्द शाळेने थेट कृती करून दाखवली आहे. पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र लॉकर्स उपलब्ध करून देऊन सरकारी शाळेतही चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण केली आहे.दररोज लागणारी पुस्तके शाळेतच सुरक्षित राहिल्याने मुलांचा शारीरिक त्रास कमी झाला असून शिक्षणातील रस नक्कीच वाढेल. सर्वप्रथम एका माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने दोन लॉकर्स प्रदान केली होती . त्यानंतर वाळवे ग्रामपंचायतीने १७ व्या वित्त आयोगातून सर्व वर्गांना लॉकर्स पुरविले. "समस्येवर केवळ चर्चा न करता प्रत्यक्ष तोडगा काढून मुलांचे बालपण जपण्याचे काम या शाळेने केले आहे." अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांतून उमटत आहेत.