Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखीसतेज पाटलांच्याकडे ठरावधारकांची संख्या कमी, म्हणून ते भाजप नेत्यांना भेटतात - धनंजय महाडिकबाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जाहिरात

 

जुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबा

schedule29 Aug 26 person by visibility 39 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना  जुनी पेन्शन मिळावी यासाठी ५ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा येणार आहे. या मोर्चास कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ व संस्थाचालक संघाने जाहिर पाठींबा व्यक्त केला आहे. मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवनमध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ पदाधिकारी यांची बैठक झाली.

आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.      १ नोव्हेबंर २००५ पूर्वी नियुक्त विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत, शाळा व तुकडीवरील, खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची नियुक्ती ही १ नोव्हेबंर २००५ पूर्वीची असूनही सदर कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना देय असूनही लाभ दिला नाही. त्यामुळे यामधील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर कोणत्याच निवृत्त वेतनाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील अनेकांना हालाकीचे जीवन जगावे लागत आहे. राज्यात  २६ हजार शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. दसरा चौक येथून १२ वाजता मोर्चाला सुरुवात होईल. व्हीनस कॉर्नर बसंत-बहार मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. या मोर्चास कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येनी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले आहे. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील १७५० शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी आपल्याकुटुंबासह उपस्थित राहणार आहेत.
    
   या बैठकीस मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, बी.जी. बोराडे, बाबासाहेब पाटील, डॉ. डी. एस. घुगरे, सुधाकर निर्मळे, सुरेश संकपाळ, मिलींद पांगिरेकर, शिवाजी माळकर, उदय पाटील, एन. आर. भोसले, व्ही. एम. पाटील, रवींद्र मोरे, जयसिंग पोवार, श्रीधर गोंधळी, के .के. पाटील, बाजीराव साळवी, एन. के. ताम्हणकर, एम. जी. पाटील, एच. वाय. शिंदे, संदीप पाथरे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes