वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षण
schedule30 Aug 26 person by visibility 18 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत नांदेकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. नांदेकर यांनी, सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर तसेच युवकांसाठी रोबोटिक्स प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी, ‘नव्या पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देणारे हे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहेत ’असे उद्गगार काढले. कार्यक्रमाला कोकण केसरी के. जी. नांदेकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषदेतील शि्वसेनेचे गटनेते अरुण जाधव, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील, प्रशांत शहापूरे, कुमार कांबळे, अतिश शिंगे, राजू सूर्यवंशी, सलीम महात, अनिरुद्ध रेडेकर, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा देसाई, बाजार समितीचे माजी संचालक कल्याणराव निकम, कृषी संचालक म दत्ताजीराव उगले, बाजार समिती संचालक संदीप वरंडेकरपंचायत समिती सदस्य धनंजय लाड, माजी सभापती कीर्ती देसाई, प्रकाश मुगडे, दिलीप पाटील, उद्योजक अभय तेंडुलकर उपस्थित होते.