Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डडशिवाजी विद्यापीठाच्या ४६ व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचे जनरल चॅम्पियनशीप विवेकानंद कॉलेजकडेप्रा. भारती भाविकट्टी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएचडीजिल्हास्तरीय आविष्कार स्पर्धेत डीआरके कॉलेजची प्राजक्ता रणदिवेचे यशकौस्तुभ गावडेंचा सोलापुरात प्रचाराचा धडाका, माळशिरसमध्ये मेळावा !महायुतीच्या नेत्यांची एकजूट अधोरेखित! ! पदवीधरांच्या प्रश्नासाठी लढणारा मी कार्यकर्ता, राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर ढकलूमहाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनेचा कौस्तुभ गावडेंना पाठिंबाना कुटंबांतील सदस्याला उमेदवारी…ना स्वीकृत संचालकपदासाठी नातेवाईकांची दावेदारी ! कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गोकुळची लढाई !!महायुतीचे दोन्ही उमेदवार अभ्यासू, शिक्षणाविषयी तळमळ असणारे !  पहिल्या फेरीत विजयी करूया !! हसन मुश्रीफ

जाहिरात

 

ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकर

schedule31 Aug 26 person by visibility 283 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  ‘फक्त खेळाडूच नव्हे तर जीवन संघर्ष करणाऱ्या प्रत्येकांना ऑलम्पिंकवीर खाशाबा जाधव यांचे चरित्र नेहमी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत वस्ताद विष्णू जोशीलकर यांनी व्यक्त केले. 

 ध्रुवतारा फाउंडेशनच्यावतीने प्रा. संजय दुधाणे लिखित ‘ऑलम्पिंकवीर खाशाबा’ पुस्तक कुस्तीगीरांना भेट देऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. जुना मोतीबाग तालमीत  महाराष्ट्र केसरी जोशीलकर व लेखक प्रा. दुधाणे यांच्या हस्ते कुस्तीगीरांना पुस्तक देण्यात आले. याप्रसंगी राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी साळुंखे, राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव अशोक पवार, कुस्ती संघटक बाबा महाडिक, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रांरभी वस्ताद बाळ गायकवाड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली . कुस्तीगीर खाशाबा जाधवांनी १९५२ मधील हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला होता. या ऐतिहासिक कामगिरीला  उजाळा देत खाशाबांचे चरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. 

कोल्हापूरातील राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे अध्यक्ष साळुंखे, धैयशील पुंगावकर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघटनेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे, क्रीडा संघटक दत्तात्रय वरूटे यांनीही खेळाडूंसाठी पुस्तक भेट उपक्रम राबविणार आहेत.  खाशाबासारखे ऑलिम्पिकवीर कोल्हापुरातून घडविण्यासाठी हे पुस्तक प्रेरणादायी असल्याचे शिवाजी साळुंखे यांनी नमूद केले. राजेंद्र मकोटे यांनी सूत्रसंचालन केले. सागर ठाणेकर  यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes