मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा महारक्तदान संकल्प
schedule21 Jul 25 person by visibility 45 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी 22 जुलै 2025 रोजी भारतीय जनता पक्षातर्फे महारक्तदान संकल्प आयोजित केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शहरातील नऊ मंडलांमध्ये रक्तदान शिबिर होत आहेत.
यामध्ये सेवा रुग्णालय कसबा बावडा, नेहरूनगर सोसायटी हॉल नेहरूनगर कोल्हापूर, राधाकृष्ण मंदिर शाहूपुरी तिसरी गल्ली, दैवज्ञ बोर्डिंग मंगळवार पेठ कोल्हापूर, शिवाजी तरुण मंडळ हॉल शिवाजी पेठ कोल्हापूर, शिव मल्हार मल्टीपर्पज हॉल खोल खंडोबा मंदिर, कै महादेवराव जाधव वाचनालय पंजाब नॅशनल बँक नजीक टाकाळा, संयुक्त बालावधूत मित्र मंडळ नाना पाटील नगर कोल्हापूर याठिकाणी कॅम्प होत आहेत अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी दिली आहे.