डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या ६४ विद्यार्थ्यांची हेक्सावेअरमध्ये निवड
schedule22 Jul 25 person by visibility 52 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाच्या ६४ विद्यार्थ्यांची हेक्सावेअर टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाली आहे. त्याचबरोबर टेकमहिंद्रामध्ये प्रोजेक्ट ट्रेनी पदावर १९ विद्यार्थ्यानी तर अपमोसीस टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेनी, फंक्शनल इंजिनिअर पदावर १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
हेक्सावेअर ही शंभर टक्के तंत्रज्ञान आधारित, ग्लोबल आयटी सेवा व बीपीओ कंपनी आहे. ती एआय, क्लाउड, ऑटोमेशनवर भर देऊन विविध उद्योगांसाठी डिजिटल परिवर्तन सुलभ करते. या कंपनीतर्फे महाविद्यालयात कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. विविध चाळण्यामधून ६४ विद्यार्थ्यांची यामध्ये कंपनीकडून निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर ४ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर सायन्स विभागाच्या ३०, एआयएमएलच्या १२, डाटा सायन्सच्या १७, इलेक्ट्रोनिक अँड टेलिकम्युनिकेशनच्या ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर टेकमहिंद्रामध्ये प्रोजेक्ट ट्रेनी पदावर १९ विद्यार्थ्यानी तर अपमोसीस टेक्नोलॉजीस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेनी, फंक्शनल इंजिनिअर पदावर १६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईगडे, सर्व विभागप्रमुख, प्लेसमेंट समन्वयकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.