कोल्हापूरच्या आयुष आडनाईकला तायक्वांदोमध्ये सुवर्णपदक
schedule22 Jul 25 person by visibility 59 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या अठराव्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो कल्चरल एक्सपो २०२५ स्पर्धेत कोल्हापूरच्या जालनावाला स्पोर्टस् ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचा विद्यार्थी आयुष यशवंतराव आडनाईकने सुवर्णपदक पटकाविले. त्याला प्रशिक्षक अमोल भोसले, ग्रॅंडमास्टर निलेश जालनावाला, वडील यशवंतराव आडनाईक व आई वृषाली आडनाईक यांचे मार्गदर्शन लाभले. बुधवारी, (२३ जुलै २०२५ ) दुपारी ३.३० वाजता त्याचे कोल्हापुरात आगमन होत आहे. छत्रपती ताराराणी चौक ते रमणमळा येथील निवासस्थानापर्यंत मिरवणुकीने स्वागत करण्यात येणार आहे. नागरिकानीय या मिरवणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन संयोकांनी केले आहे.