साहस की तुम मिसाल बनो, जीवन मे चमकते रहो ! पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळेंचा सत्कार!!
schedule21 Jul 25 person by visibility 171 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कसबा बावड्याचे सुपुत्र कृष्णात पिंगळे यांची पोलिस उपायुक्तपदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. आमदार सतेज पाटील व आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत कसबा बावड्यात सत्काराचा हा कार्यक्रम पार पडला.
आमदार पाटील यांनी, पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती हे कृष्णात पिंगळे यांचं यश एक सजग, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्याची पावती आहे. त्यांची समाजाप्रती असणारी जाणीव पाहता ‘कृष्णात साहस की तुम मिसाल बनो, जीवन की हर उडान में चमकते रहो!’ अशा शुभेच्छा देऊन भावना व्यक्त केल्या.आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे हे सर्वसामान्य माणसांना आधार देणारे अधिकारी आहेत. धाडसाने कामगिरी पार पाडतात. सत्काराला उत्तर देताना पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळे म्हणाले, सेवाकाळात विविध पदावर काम केले. काम करत असताना सामान्य लोकांशी बांधिलकी ठेवली. हा अधिकारी आपला आहे अशी भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे. अधिकार पदावर काम करत असताना डोक्यात कधी हवा जाऊ दिली नाही.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपअधिक्षक अजित टिक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, वरिष्ठ लेखाधिकारी रणजीत झपाटे, संदीप पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे चेअरमन संतोष पाटील, प्रा. विश्वास धामणे, संभाजी हराळे, श्री बिरदेव देवस्थान ट्रस्टचे सुनील वडर, दत्ता मासाळ, माजी नगरसेवक सुभाष बुचडे, राजू डकरे, मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, प्रा. महादेव नरके, सचिन चौगले, कृष्णात पिंगळे यांच्या आई छाया पिंगळे उपस्थित होते. मुख्याध्यापक विलास पिंगळे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी पिंगळे यांनी गौरवपत्राचे वाचन केले.प्रा. लक्ष्मण करपे यांनी आभार मानले.