भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मोटारसायकल रॅली
schedule22 Jul 25 person by visibility 19 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी (२३ जुलै २०२५) देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत व केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुखभाई मांडविया यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन होणार आहे. पुणे शहरात या निमित्ताने सायंकाळी ६ वाजता एस.पी. कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांचे मार्गदर्शन होणार असून अध्यक्षस्थानी अर्जुन चव्हाण, तर जिल्हा सचिव सागर पवार हे मागील वर्षातील कामाचा आढावा सादर करणार आहेत. या कार्यक्रमाआधी संध्याकाळी ४.३० वाजता शनिवारवाडा ते एसपी कॉलेज दरम्यान मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.