Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती

जाहिरात

 

विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर

schedule31 May 26 person by visibility 39 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी भारतीय जनता पक्षातर्फे 11 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.रविवारी रात्री ही यादी प्रसिद्ध झाली. यामध्ये सोलापुरातून राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली. सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून  धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळाली. नागपूर विधान परिषदेसाठी डॉ. राजीव पोतदार यांना तिकीट जाहीर झाले आहे. भंडारा-गोंदियातून अविनाश ब्रह्मणकरांना तर अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी मिळाली आहे. नांदेड येथून अमर राजूरकर तर अहिल्यानगरमधून अपेक्षेप्रमाणे प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी मिळाली. धाराशिव - बीडमधून बसवराज पाटील यांना तर जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी मिळाली आहे. वर्धा- चंद्रपूर- गडचिरोली अरुण लखाणी यांना उमेदवारी मिळाली. संभाजीनगर -जालना विधान परिषद मतदार संघातून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी मिळाली

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes