हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटील
schedule30 May 26 person by visibility 25 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘समाजात बदलत्या जीवनशैलीमुळे कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत संवाद, समजूतदारपणा आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘हितैशी समुपदेशन केंद्र’ हे समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक ठरणार आहे.’असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
ताराबाई पार्क येथील रेसिडेन्सी क्लबमध्ये संवेदना सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘हितैशी समुपदेशन केंद्राच्या’ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अंजली पाटील यांची उपस्थिती होती. अॅड. किरण खटावकर यांनी बदलती जीवनशैली, वाढता तणाव, स्पर्धा या कारणीभूत असल्याचे नमूद करत एकत्र कुटुंब पद्धती व आपुलकीचा संवाद महत्वाचा असल्याचे नमूद केले. डॉ सतीश पत्की वंध्यत्व कारणे दोघांच्यात असून, लग्नाचे वाढते वय, मोबाईलचे दुष्परिणाम, खाण्यातील बदल, मानसिक व शारिरिक बदल, व्यसनाधिनता असून सकस आहार निरोगी शरीर महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपचाराच्या विविध पद्धतींची सविस्तर माहिती दिली. वर्षा विनोद तावडे यांनी दत्तक या शब्दाचा अर्थ आणि भावनिक बाजू स्पष्ट केल्या. संगीता बनगीनवार दत्तक प्रक्रिया बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. श्रेया श्रीकांत भारतीय यांनी प्रति पालकत्व योजना याची व्याख्या समजून सांगितले. ‘हितैशी समुपदेशन केंद्राच्या’ माध्यमातून अनुभवी समुपदेशक, डॉक्टर आणि तज्ज्ञ नागरिकांना सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून मार्गदर्शन करणार असून समाजातील विविध प्रश्नांवर सुसंवादातून सकारात्मक उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याप्रसंगी संवेदना फाउंडेशनचे वृंदा सलगर, राहुल चिकोडे, नितीन कामत, शिवाली निंबाळकर, अमित लव्हटे, राजकुमार पाटील यांच्यासह यावेळी सुरेंद्र जैन ,तेजस्विनी सावंत, संजीव कुलकर्णी, सौम्या तिरोडकर, मेधा पानसरे, सन्मती मिरजे, प्रमोद पाटील, सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, शामराव जोशी आदी उपस्थित होते.