राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागर
schedule30 May 26 person by visibility 44 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन : राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गाळेधारकांसाठी एक आदर्शवत, पारदर्शक आणि न्याय भाडेदर "रोल मॉडेल" तयार करावे. ज्याचे अनुकरण राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही फायदेशीर ठरेल, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.
महापालिकेच्या गालेधारकांच्या भाडेदरासंदर्भात महानगरपालिकेत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या सुरवातीस आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक माहितीचे सविस्तर सादरीकरण केले. यानंतर गाळेधारक शिष्टमंडलातील प्रमुखांनी आपल्या मागण्या बैठकीत मांडल्या. कोल्हापूर महापलिका क्षेत्रात विविध बाजारपेठात साधारणत: १७०० गाळेधारक असून, गेली अनेक वर्षे नियमितपणे गाळेभाडे महानगरपालिका प्रशासनास देत आहेत. २०१६ पर्यंत गाळेधारक जुन्या नियमावलीनुसार आकारण्यात येणाऱ्या भाड्याची रक्कम भरत होते. या बैठकीत बोलताना क्षीरसागर म्हणाले, "महापालिकेचे आर्थिक उत्पन्न स्तोत्र मर्यादित असल्याने, उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचेच आहे. परंतु, यामध्ये कोणाही गाळेधारकांवर अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेणे गरजेचे आहे. यामुळे दोन्ही बाजूंच्या समन्वयाने हा प्रश्न निकाली काढणे गरजेचे आहे. याकरिता प्रत्येक ठिकाणच्या गाळेधारकांच्या प्रतिनिधीसोबत महानगरपालिका प्रशासनाची समिती स्थापन करून, भौगोलिक व व्यावसायिक परिस्थितीचा अभ्यास करून भाडेदराचा प्रश्न निकाली काढावा,"
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी, महापालिकेचे आर्थिक उत्पन्नाचे साधन मर्यादित असल्याने सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोणावरीही अन्याय होणार नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सुचनेप्रमाणे वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात येतील. सरसकट एकच फॉर्म्युला न ठेवता ए, बी, सी असे वर्गीकरण करून या समित्यांच्या बैठका घेत दोन्ही बाजूच्या समन्वयातून येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.
उपमहापौर अक्षय जरग, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, गटनेते शारंगधर देशमुख, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव नगरसेवक ऋतुराज राजेश क्षीरसागर, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, शिवसेना शहरप्रमुख रणजित जाधव, नगरसेविका मंगल साळोखे, नगरसेविका अनुराधा खेडकर, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक अभिजीत खतकर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, नगरसेवक अश्किन आजरेकर, माजी नगरसेवक अशोक पवार, माजी परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी, अजित चव्हाण, अमर क्षीरसागर, रमेश मोरे, इस्माईल बागवान, अशपाक आजरेकर, अजित कोठारी, गणेश वाळवेकर उपस्थित होते.