Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नतीआयकर कायदा २०२५ च्या नव्या पर्वाचे ‘पुनर्मंथन’ कोल्हापुरात, शनिवारी - रविवारी राष्ट्रीय परिषदराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी टास्क फोर्सची स्थापना, नऊ सदस्यीय समितीत कुलगुरू डॉ. आर. के. कामतचप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार मेघराज भोसले यांच्या समर्थ पॅनेल विरोधात चित्रकर्मी पॅनेल, अपक्षांची संख्याही मोठी

जाहिरात

 

गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!

schedule30 May 26 person by visibility 1238 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीची छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी  जाहीर झाली. कोल्हापुरात रेसिडेन्सी क्लबमध्ये दुपारी तीनच्या सुमाराला महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे,  आमदार अमल महाडिक, जनसुराज युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रमुख उपस्थित होते.
     गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने नेतेमंडळांची बैठक झाली.यासंदर्भात बोलताना आमदार डॉ.  विनय कोरे-   म्हणाले, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आम्हा सर्वांना महायुतीची बैठक घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार निवडणूक नियोजनाच्या अनुषंगाने आम्हा सर्व नेतेमंडळांची एकसंघपणे अतिशय चांगली चर्चा झाली. महायुती म्हणून आम्ही सगळे एकसंघपणे गेल्यानंतर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली चित्र निर्माण होणार आहे. मधल्या काळात आमच्यातीलच काही कार्यकर्त्यांच्या दुखावलेल्या भावना या सगळ्याचे प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणात उमटलेही होते. त्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत महायुती एकत्र येणार की नाही? अशा पद्धतीचे थोडसं वेगळं वातावरण निर्माण झाले होते. आज या सगळ्या विषय आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून एकसंघपणे सामोरे जाणार आहोत.
======

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes