Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूकअमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणीओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलनकसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजराआरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावरगणेशोत्सवातील कामांना शिक्षकांचा विरोध, सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलितसाऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार   

जाहिरात

 

भुयेवाडी-सादळेमादळे रस्त्याच्या कामासाठी निधी मिळावा, राष्ट्रवादीतर्फे अजित पवारांना निवेदन

schedule31 Aug 25 person by visibility 197 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भुयेवाडी ते सादळे मादळे रस्त्याचे कामासाठी निधी तात्काळ मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवाद काँग्रेस पक्षाचे करवीर विधानसभा अध्यक्ष करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, सुरज बागडे, अमर परिट,  बाबासो भारतीय यांनी निवेदन दिले.

भुयेवाडी ते कासारवाडीमार्गे सादळेमादळे जाण्यासाठी वीस किलोमीटरपेक्षा अधिक अंतराचा फरक पडतो. भुयेवाडी ते पोहोळे, कुशिरे, गिरोली मार्गे सादळे मादळे जाण्यासाठी एवढेच अंतर होते. परंतु भुयेवाडी ते सादळे मादळेमधून फक्त अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. हा रस्ता झाला तर शेतकरी व कर्मचाऱ्यांची सोय होईल असे निवेदनात म्हटले आहे. दिवंगत मंत्री दिग्विजय खानविकर यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध केला होता. मात्र काही कारणास्तव हा निधी खर्ची पडला नाही. यामुळे रस्त्याचे काम होऊ शकले नाही. सादळे मादळे ते भुयेवाडी मार्गे कसबा बावडा असारस्त्याचा मार्ग मंत्री खानविलकर यांनी लोकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  राजाराम बंधारा येथील बंधाराही सध्या अर्धवटच राहिलेला आहे त्यामुळे लोकांना वापर करता आलेला नाही याकडे प्रशासनाचे  दुर्लक्ष आहे. तरी यासाठी तात्काळ निधी उपलब्ध होऊन हा रस्ता मार्गी लागावा आणि लोकांची होणारी गैरसोय दूर व्हावी असे निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes