Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे शाहू्प्रेम ! लोकराजावर पाच भाषेत गोष्टीरुपात सचित्र पुस्तक निर्मिती !!हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंग

जाहिरात

 

प्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरण

schedule20 Jun 25 person by visibility 131 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सर्वांसाठी घर योजना हे केंद्र सरकारचे महत्वाचे धोरण आहे. राज्य सरकारने देखील या धोरणाचा स्वीकार केला आहे. या अनुषंगाने राज्यात राज्य व्यवस्थापक कक्ष ग्रामीण घर निर्माण कार्यालय यांच्याकडून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. यांतर्गत महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम २१ जून २०२५ रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात दुपारी दोन वाजता होत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेमध्ये ये पुणे जिल्हा प्रथम, सातारा जिल्हा द्वितीय तर कोल्हापूर जिल्हा परिषद तृतीय क्रमांकांचा मानकरी आहे. सर्वोत्कृष्ट पंचायत समितीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात  शाहूवाडी तालुका प्रथम, करवीर तालुका द्वितीय तर फलटण तालुका तृतीय क्रमांकावर आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मत्रेवाडी व लिंब ग्रांमपंचायत प्रथम, महाबळेश्वर तालुक्यातील शिरवली द्वितीय तर पाटण तालुक्यातील सडा वाघापूर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.

राज्य पुरस्कृत आवास योजनेत पुणे जिल्हा प्रथम, कोल्हापूर जिल्हा द्वितीय तर सांगली जिल्ह्याला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. सर्वोतकृष्ट तालुकेंतर्ग पंचायत समित्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारात पुणे जिल्ह्यातील खेड , इंदापूर व बारामती हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवले आहेत. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये सांगली जिल्ह्यातील बलवडी खालसा व सातारा जिल्ह्यातील रासाटी हे प्रथम क्रमांकाचे विजेते आहेत. द्वितीय क्रमांक पुणे जिल्ह्यातील कुरवडीला तर तृतीय क्रमांक कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील उत्तूरला मिळाला आहे.वाळू उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यासाठी दिला जाणारा प्रथम क्रमांक पंढरपूरला मिळाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत सरकारी जागा उपलब्धता सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे तालुकातंर्गत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुका हा प्रथम, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका द्वितीय तर माढा तालुका तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे.राज्य पुरस्कृत आवास योजनेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव प्रथम क्रमांकावर आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes