Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंगशहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !डीवाय पाटील अभियांत्रिकीचा चार दशकांचा प्रवास अभिमानास्पद- डॉ. संजय डी. पाटीलहद्दवाढीच्या विरोधात वीस गावांच्या सरपंचांची वज्रमूठ ! कोल्हापुरात बैठक, आबिटकर-मुश्रीफ-क्षीरसागर यांच्यावर निशाणाफैरी झडू लागल्या, प्रभाग रचनेवरुन काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोपजिल्ह्यासाठी ६५ हजार घरकुले मंजूर, डिसेंबरपर्यंत ५० हजार पूर्ण होणार- सुषमा देसाईपत्नीच्या स्मरणार्थ प्राध्यापकांकडून विद्यापीठातील होस्टेलसाठी पाच लाखाची देणगीराज्यपालांच्या उपस्थितीत लवकरच सर्व कुलगुरुंची  बैठकवडणगेत विद्यार्थ्यांच्या स्वागताला खासदार, शाळा प्रवेशोत्सव जल्लोषात

जाहिरात

 

जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटस

schedule19 Jun 25 person by visibility 165 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कर्मचाऱ्यांची जनरल प्रॉव्हिडंड फंडासंदर्भातील माहिती ऑनलाइन उपलब्ध करणार आहे. त्यासाठी मोबाइल अॅप तयार केले आहे. यामुळे प्राव्हिडंड फंडाचा स्टेटस एसएमएसवर समजणार आहे. येत्या काही दिवसात या नव्या प्रणालीचा अवलंब करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली ही नवी प्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय झाला. त्यादृष्टीने वित्त व  लेखा विभागाने सगळी तयारी केली आहे. अशी माहिती वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे यांनी दिली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा परिषदेशी निगडीत जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. प्रॉव्हिडंड फंडाची कामे यापूर्वी मॅन्युअल पद्धतीने व्हायची. त्या कामासाठी विलंब लागायचा. आता नव्या ईजीपीएफ प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचा फंडासंदर्भातील कागदपत्रे जमा करणे, मुख्यालयापर्यत धावाधाव करणे हे थांबणार आहे. कागदपत्रे जमा करण्यापासून फंडासंबंधीची सगळी कामे आता ऑनलाइन होणार आहेत. शिवाय फंडाचा स्टेटस तत्काळ मोबाइल अॅपद्वारे कळणार आहे. कर्मचाऱ्यांना इथंभूत माहिती समजेल.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes