Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्या

जाहिरात

 

आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !

schedule05 Nov 26 person by visibility 3217 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी  सरकार दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह सेवा ज्येष्ठतेसंदर्भातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या भेटीदरम्यान शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांचे गांभीर्य मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या. जुनी पेन्शन योजना, सेवा ज्येष्ठतेतील अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी निगडित विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याची आग्रही मागणी आमदार गावडे यांनी केली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष  सचिन नलवडे उपस्थित होते.

………….

‘ शिक्षकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक आणि शिक्षण क्षेत्रातील घटकांना सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, न्याय्य मागण्यांना निर्णयाची जोड मिळेपर्यंत हा लढा सातत्याने सुरू राहील.’

  • कौस्तुभ गावडे, शिक्षक आमदार, पुणे विभागीय मतदारसंघ

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes