Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्यास्मॅकच्या अध्यक्षपदी भरत जाधव, उपाध्यक्षपदी प्रशांत शेळकेगोकुळमध्ये बहुमत समविचारी आघाडीलाच, अध्यक्ष निवडीत घोळ घातल्यास रस्त्यावर उतरून लढाई करूगोकुळमध्ये शासन नियुक्त चार संचालक वाढणार, मतदानाचा अधिकार मिळणार ! मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरीसतेज पाटलांची गोकुळबद्दलची भावना लोकशाहीसाठी कमी अन स्वतःच्या राजकीय सुलभतेसाठी अधिक- महायुतीचा टोला शासन नियुक्त संचालक संख्येवरून सतेज पाटलांचा हल्लाबोल, गोकुळमध्ये कौल आमच्याच बाजूनेकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेस भरघोस निधी देऊ - खासदार धनंजय महाडिकपवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेबाबत संस्थाचालकांना मार्गदर्शनवारणा विद्यापीठाचा पहिला युवा महोत्सव फुलला विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांनी

जाहिरात

 

करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभ

schedule04 Nov 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिष्यवृत्ती सराव परीक्षांमुळे शिष्यवृत्ती परीक्षेचा सराव होऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते व तसेच त्याचा मोठा फायदा अंतिम परीक्षेत होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हायतील शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यास या उपक्रमाचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वास प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांनी व्यक्त केला. 
शिक्षण विभाग पंचायत समिती करवीर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.  सराव परीक्षा शुभारंभ कन्या व कुमार विद्या मंदिर कोगे येथे नुकताच झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अर्चना पाथरे होत्या.
     शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश आंग्रे  यांनी गुणवत्ता यादीतील येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असून सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा चांगला सराव होणार आहे असे मत व्यक्त केले.   दरम्यान प्रशासनाच्या वतीने परीक्षेचे आयोजक प्रसाद हिंदुराव पाटील व सुरेश गुंडू कोळी यांचा शिक्षणाधिकारी घुगे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास केंद्र प्रमुख मनिषा सपाटे, राणेश्वर थोरबोले, सुकुमार मानकर,श्री कांत टिपूगडे, धनाजी सासणे तसेच शिष्यवृत्ती परीक्षा समितीतील प्रमुख उत्तम पाटील, दिनकर परीट, केंद्र संचालक तथा कन्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी बागडी, कुमार शाळेचे मुख्याध्यापक विकास सातवेकर, संदीप पाटील,  तानाजी पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes