प्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ
schedule05 Nov 26 person by visibility 123 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. जी.पी. माळी यांच्या 'काट्यावरची फुलं' या आत्मकथनाचा प्रकाशन समारंभ गुरुवारी ( 12 नोव्हेंबर 2026 ) सायंकाळी पाच वाजता होणार आहे. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. माजी प्रशासकीय अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ होत आहे.
अतिशय खडतर प्रवास करत आयुष्याच्या एका यशाच्या टप्प्यावर पोहोचलेल्या प्राचार्य माळी यांनी 'काट्यावरची फुलं' या आत्मकथनात आपल्या संघर्षाचे आणि यशाचे धागे उलघडले आहेत. अक्षर दालनच्यावतीने हे आत्मकथनाचा प्रकाशित करण्यात येत आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवृत्त पोलीस उप अधीक्षक एन. आर. माळी, नामवंत कवयित्री डॉ. सौ. जयश्री अय्यंगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन अक्षर दालन प्रकाशन व माळी परिवाराने केले आहे.