Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
तास प्रश्नोत्तराचा की वेळकाढूपणाचा ! सिनेट सभेत एकाच प्रश्नाभोवती चर्चा, दुसऱ्या विषयांना बगल देण्याचा डाव ! !शासन नियुक्त पाच संचालक निवडीच्या वटहुकूमावर राज्यपालांची स्वाक्षरीसोमवारच्या संघर्ष मोर्चाने सरकारला धडकी भरेल, काँग्रेस कमिटीत पदाधिकारी - कार्यकर्त्यांचा निर्धारविजयाचा इतका उन्माद की मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांचाही अपमान, हसन मुश्रीफांचा सतेज पाटील यांच्यावर निशाणादिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ 

जाहिरात

 

गोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटील

schedule05 Nov 26 person by visibility 138 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर दुध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनी कौल दिलेला असताना तो नाकरण्याचे पाप महायुती सरकार करत आहे. पाच सरकारी सदस्य नियुक्त करण्याचा सरकारचा निर्णय हा स्वाभिमानी कोल्हापुरकरांचा अपमान असून जनतेने नाकारले असतानाही केवळ गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी सरकाराच हा खटाटोप आहे. महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय सहकारी क्षेत्रासाठी काळा दिवस आहे, असे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.   

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील पुढे म्हणाले की, मी येताना गोकुळचे गुलाबजाम आणि श्रीखंड आणणार होतो पण गडबडीत ते राहून गेले, कारण गोकुळ या नावाचे पदार्थ शेवटचेच पाहून घ्या, उद्या त्यावर अमूलचे लेबल लावून गोकुळ संस्था त्यांच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने नवा कायदा गोकुळला केंद्रीभूत मानून केला आहे. या नव्या कायद्यातून साखर कारखाने व जिल्हा बँकांना वगळण्यात आले आहे, फक्त गोकुळमधील सत्ता मिळवण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.

भाजपा सरकार सहकार क्षेत्रात चुकीचा पायंडा पाडत आहे. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार आहे, निवडणूक झाल्यानंतर कायदा आणून तो पूर्वलक्षी प्रभावाने कसा काय लागू होतो. कोल्हापूरकांनी जो कौल दिला तो नाकारण्याचे काम सरकार करत आहे. सरकारने घेतलेला निर्णय कोल्हापूरकर कदापी मान्य करणार नाहीत. याविरोधात रस्त्यावर उतरून लढा देऊ व न्यायालयातही दाद मागणार आहोत. ९ नोव्हेंबरला कोल्हापूरात दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  
गोकुळवर साडेपाच लाख शेतकऱ्यांचा संसार चालतो, शेतकऱ्यांच्या कष्टाला दर दहा दिवसाला १०० कोटी रुपये दिले जातात. दररोज २० लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे, गोकुळ शेतकऱ्याच्या मालकीचा आहे आणि भाजपा सरकार शेतकऱ्यांचा कौल डावलत आहे. हा कायदा करण्यामागे मंत्री हसन मुश्रीफ व चंद्रकांत पाटील यांचा सहभाग आहे असेही  पाटील म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes