Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीनंतर स्थायी समिती सभा, शेवटच्या आठवड्यात सर्वसाधारण सभा!सन्मानजनक निधी द्या, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या सदस्यांची बैठकगोकुळमध्ये कोणाचीही बॅकडोअर एंट्री होणार नाही, तज्ज्ञ व्यक्तीच संचालक होतीलगोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, नऊ नोव्हेंबरला कोल्हापूरात संघर्ष मोर्चा -आमदार सतेज पाटीलशिक्षणाधिकारी मीना शेंडकर निलंबित, शालेय शिक्षण क्रीडा विभागची कारवाईप्राचार्य जी.पी. माळी यांच्या काट्यावरची फुलं या आत्मकथनाचा बारा नोव्हेंबरला प्रकाशन समारंभ आमदार कौस्तुभ गावडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! जुनी पेन्शन योजना -सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नाकडे  वेधले लक्ष ! !सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक करवीर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा शुभारंभपुणे-बेंगलोर महामार्गावर ३२ तासांपासून स्वाभिमानीचा एल्गार, किणी टोल नाक्यावर हजारो शेतकऱ्यांचा ठिय्या

जाहिरात

 

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट -सेट आवश्यक

schedule05 Nov 26 person by visibility 167 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील महाविद्यालय तसेच विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक पद भरतीसाठी नेट सेट हीच अर्हता असल्याबाबतचे स्पष्टीकरण राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक ३० जून २०२३ च्या अधिसुचनेच्या  अनुषंगाने राज्याने दिनांक ५ मार्च २०२४ रोजी शासन  निर्णय करुन राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट किंवा सेट असणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले होते.उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चार नोव्हेंबर २०२६ रोजी यासंबंधीचा आदेश काढला आहे.
तथापि या आदेशाबाबत राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये तसेच सहसंचालक कार्यालयांकडे संभ्रम होता,
  म्हणून राज्याच्या संचालकांनी याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे ऑगस्ट २०२६ मध्ये स्पष्टीकरण मागितले  होते. त्याच अनुषंगाने उच्च शिक्षण विभागाने स्पष्टीकरण देऊन नेट किंवा सेट हीच किमान अर्हता असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे  दिनांक ५ मार्च २०२४ पासून नेट किंवा सेट ही अर्हता नसताना  केवळ पीएच. डी. पदवीच्या आधारे नियुक्त्या झाल्या आहेत. त्या प्राध्यापकांना आता नेट, सेट उत्तीर्ण होणे आवश्यक असणार का यासंबंधी उच्च शिक्षण विभाग काय धोरण ठरविते याकडे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes