Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रविवारी होमेसाकॉन परिषद - डॉ. राजकुमार पाटीलसांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेश

जाहिरात

 

वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर, पाच एप्रिलला वितरण

schedule26 Mar 26 person by visibility 57 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या पाच एप्रिल २०२६ रोजी पुरस्कार वितरण समारंभ आहे. स्वर्गीय विलासराव कोरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा समारंभ आयोजित केला आहे. यावेळी साहित्य पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही आहे.

 साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय स्वर्गीत तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कार हा लेखिका आशा नेगी यांच्या ‘ब्युटी ऑफ लाइफ’ या साहित्यकृतीला जाहीर झाला आहे. स्वर्गीय सावित्रीआक्का कोरे काव्य पुरस्कार हा कवी धनाजी धोंडिराम घोरपडे यांच्या ‘जामिनावर सुटलेला काळा घोड” या कवितासंग्रहाला, स्वर्गीय शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कार प्रा. अरविंद मानकर यांच्या ‘घुंगरु’ कथासंग्रहाला तर स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कार हा वर्षा कुळकर्णी यांच्या ‘काळीज फूल’ साहित्याला जाहीर झाला. स्वर्गीय मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कार अॅड. संगीता केंजळे यांच्या ‘जादूची छडी’ला जाहीर झाला आहे.

या समारंभात लेखक प्रशांत कुलकर्णी यांचा ‘यशगंध’ या चरित्रात्मक उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या समारंभाच्य अध्यक्षस्थानी आमदार विनय कोरे आहेत. शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.पत्रकार परिषेदवेळी चंद्रकांत निकाडे, पी. एस. पाटील, पी.आर. आंबी, डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. पी. बी. बंडगर, शिवाजी बारचाटे, धनपाल पाटील, प्रा. चंद्रकांत गिरी, प्रा. सुरेश आडके, नसीम जमादार, अभिजीत कुंभार आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes