कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणे
schedule27 Mar 26 person by visibility 78 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी व उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाने यांची फेरनिवड करण्यात आली. असोसिएशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या.2026-27 करिता पदाधिका-यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. असोसिएशनच्या ऑनररी सेक्रेटरीपदी नितीन मोहन वाडीकर, खजिनदारपदी प्रसन्न आण्णासोा तेरदाळकर यांची फेरनिवड करण्यात आली. कोल्हापूर उद्यमवार्ताच्या मुख्य संपादकपदी संचालक वाडीकर यांची फेरनिवड झाली. संचालक दिनेश बुधले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
नूतन अध्यक्ष कुलकर्णी यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सभासदांच्या व संस्थेच्या हिताचे कामकाज केलेचे सांगितले तसेच वर्षभरात विविध समारंभ, सभा, सभासदांसाठीचे उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संचालक,निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. सभासद उद्योजकांचे विषय आणि प्रश्न विविध शासकीय विभागाकडील योजना तसेच समस्या सोडविण्यासाठी कार्य सुरू आहे तो पाठपुरावा सुरू राहील अशी ग्वाही दिली. यावेळी संचालक कुशल सामाणी, संजय अंगडी, सचिन मेनन, बाबासो कोंडेकर, अतुल आरवाडे, हर्षद दलाल, अमर करांडे, अभिषेक सावेकर, प्रदीप व्हरांबळे, उपस्थित होते.