Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

अन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षण

schedule27 Mar 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ कोल्हापूरची खाद्य संस्कृती जगभर नावाजलेली आहे. हे नावं असेच जपणे आणि ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’असे प्रतिपादन अन्न व औषधं प्रशासन कोल्हापूरच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती प्रदीपा फावडे यांनी केले.
 गांधीनगर येथे अन्न व औषधं प्रशासन विभागातर्फे अन्न व्यवसायिक व अन्न हताळणी करणाऱ्यासाठी फॉस्टॅक फूड सेफ्टी प्रशिक्षण व प्रमाणिकरण प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. त्याप्रसंगी त्या बोलत हो. या कार्यक्रमाला २५० हून  अधिक जणांची उपस्थिती होती. फावडे म्हणाल्या, अन्न व्यवसायिक यांच्या उत्पादन प्रक्रियेतुन ग्राहकांच्या पर्यंत चांगले, सुरक्षित अन्न जावे हा या प्रशिक्षणाचा उद्देश आहे. त्याचबरोबर
  अन्न उत्पादन करणाऱ्यां तुम्हा सर्वाना नवीन कायद्याची माहिती होईल. त्यामुळे तुम्ही अधिक जाणीवपूर्वक चांगले सकस व सुरक्षित उत्तमप्रतीचे अन्न ग्राहकांना द्याल त्यांचा आनंद ग्राहकांना मिळेल.यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
    प्रशिक्षक श्रीमती क्रांती घोडके यांनी माहिती देताना सांगितले की, अन्नाची सुरक्षा घ्यावयाची काळजी, सुरक्षा कवच कसे वापरावे, वैयक्तिक स्वछता, अन्न साठावणूक पद्धती याची माहिती देवून कचरा व्यवस्थापन, कायद्याच्या तरतुदी, चुकीच्या अन्ना मधून होणारे आजार कसे टाळले पाहिजेत याचीही सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, पांडुरंग घुगे, श्रीमती श्रद्धा साळुंखे यांच्यासह गांधीनगर येथील कॉन्फेकशनरी असोसिएशनचे सुदाम रोहिडा, दीपक वलेचा, हरीश वंजानी किराणा असोसिएशनचे सुनील कोहिरिमल, रमेश पंढरे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes