32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणार
schedule27 Mar 26 person by visibility 157 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : ज्या कॉलेजमध्ये शिकले, त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. पुढे मराठी विभागप्रमुख झाले आणि एकाच कॉलेजमधील 32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत मारुती दळवी हे 28 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. येथील महावीर महाविद्यालय येथे ते मराठी विभाग म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख हे प्रमुख पाहुणे आहेत. संस्थेचे अध्यक्ष के ए कापसे हे अध्यस्थानक्ष भूषविणार आहेत. प्राचार्य अद्वैत जोशी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता महावीर कॉलेज परिसरातील आचार्य विद्यानंद संस्कृती भवन येथे होत आहे. प्रा. दळवी हे प्रयाग चिखली येथील आहेत. महावीर कॉलेजमध्ये त्यांनी कॉलेजचे शिक्षण घेतले. 1994 मध्ये महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. मराठी विभागप्रमुख अनेक वर्षे कामे केली.