Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची बदली, डॉ. मैनाक घोष नवे जिल्हाधिकारी32 वर्षाच्या सेवेनंतर प्रा. जयवंत दळवी शनिवारी सेवानिवृत्त होणारलोकप्रतिनिधींच्या पत्रावर दहा दिवसात कार्यवाही, गाव तिथं स्वच्छतागृह ! जिप अध्यक्षांचे सीईओंना पत्रकोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कमलाकांत कुलकर्णी, उपाध्यक्षपदी श्रीकांत दुधाणेइंधनाचा साठा मुबलक प्रमाणात - आमदार राजेश क्षीरसागरडॉ. संजय डी. पाटील, भरत लाटकर यांना पुरस्कार , शनिवारी विद्यापीठात वितरण समारंभ सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरणअन्न - औषध प्रशासन विभागातर्फे गांधीनगरमध्ये फूड सेफ्टी प्रशिक्षणशिवसेना गटनेते शारगंधर देशमुख यांचा कार्यालयीन प्रवेशमहिला शेतीकामात होत्या तोपर्यंत आजारांच्या समस्या कमी होत्या

जाहिरात

 

सरोजिनी फार्मसी कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद, शोधनिबंध - पोस्टर सादरीकरण

schedule27 Mar 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  कोल्हापूर : येथील सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान प्रणाली व आधुनिक वैद्यकशास्त्र यांचे एकात्मिकरण याविषयी राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेला आठ राज्यातून फार्मसी महाविद्यालयातील तीनशेहून अधिक डीफार्मसी, बीफार्मसीतील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या परिषदेत ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण झाले.

या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविले. शिवाजी विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, प्रा. के. एस. लड्डा, डॉ. बनाप्पा उंगर, प्रा. प्रमोद एच जे, बी. सी. काहेर, डडॉ. योगेश्वर आर. चीप्पा, प्राजक्ता देशपांडे, संस्थेच्या अध्यक्षा शोभा तावडे, संचालक डॉ. अनिलकुमार कुलकर्णी, प्राचार्य आदित्य अरविंदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शोधनिबंध व पोस्टर सादरीकरण स्पर्धेसाठी डॉ. विक्रम पोतदार, डॉ. किरण पाटील यांनी परीक्षक म्हणून काम केले. प्रा. निषिता वाणी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुचिता चौधरी यांनी आभार मानले. डॉ. सचिन पाटील, प्रा. भूषण वर्णे यांनी नियोजन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes